HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपच्या या नेत्यांवर गुन्हा दाखल

वाशिम | पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांची नावं घेण्यात आली आहे. त्यात विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.या प्रकरणात पूजा चव्हाण या मुलीची तर बदनामी झालीच.

पण तिच्या परिवाराची आणि संपूर्ण बंजारा समाजाचीही बदनामी झाली. त्या पीडितेने आत्महत्या केली की काय? याचा तपास पोलीस करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला. तसंच कोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली करत एका स्त्रीची संपूर्ण भारतात जाणून बुजून बदनामी करणाऱ्या संबंधित भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

मनोरा पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आली आहे. भाजप नेत्यांनी पीडित पूजा चव्हाणचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. बंजारा परिषदेने केलेल्या या तक्रारीनुसार मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अतुल भातखळकरांचा सरकारवर हल्ला! म्हणाले…..’

News Desk

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार  

News Desk

टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

News Desk