HW News Marathi
क्राइम

क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, शहारुख खान चा मुलगा ताब्यात?

मुंबई | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे. यामध्ये एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. तो मुलगा अभिनेता शहारुख खानचा असल्याचं समजतंय. त्यामुळे आता याप्रकरणात काय समोर येते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

क्रुझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. शनिवारी ही बोट गोव्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी ही बोट पुन्हा मुंबईत परतणार होती. या क्रुझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार अंमली नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच क्रुझवर प्रवेश मिळवला होता. क्रुझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. यावेळी समीर वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला.

क्रुझवर पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रुझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रुझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्याठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Aprna

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | पोलीस, माध्यमांद्वारे चौकशी करणे ही योग्य पद्धत नाही !

News Desk

लहान मुलांच्या वादात मोठ्यांची हाणामारी

News Desk