मुंबई | टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांला टॅक्सी चालकासह दोन अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २५ मार्चला दुपारी एक ते दीडच्या दरम्यान तक्रादाराने सेनापती बापट मार्ग, माटुंगा पश्चिम येथून फिनिक्स मॉल, लोअर परेलला जाण्यासाठी टॅक्सी पकडली होती. टॅक्सी थोडी पुढे गेल्यानंतर टॅक्सी चालकाने आणखी दोन अज्ञात व्यक्तींना टॅक्सीमध्ये बसवले. याबाबत टॅक्सी चालकाला तक्रादाराने विचारले तेव्हा टॅक्सी चालकानी असे सांगितले की, तो त्यांना पुढे सोडणार आहे. टॅक्सी दादरच्या फुल मार्केटला पोहोचल्यानंतर टॅक्सीमध्ये बसलेल्या दोन्ही व्यक्तींनी टॅक्सी चालकाने जिथून त्यांना बसविले तिथे परत सोडण्यासाठी सांगितले. त्यावेळी टॅक्सी चालकाने टॅक्सी सेनापती बापट मार्गला न थांबवता माटुंगा स्टेशन जवळील आझादनगर ब्रिज जवळ थांबवली आणि तक्रारदाराला जबरदस्तीने मारहाण करुन त्याच्या जवळील ४००० रुपये आणि त्याचा मोबाईल फोन काढुन तिथून पळ काढला. त्यानंतर तक्रारदाराच्या सांगण्यावरून रात्री ९च्या सुमारास शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध भारतीय दंड विधानचे कलम ३९२ आणि ३४ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभाग, युनिट ३ ला या गुन्हयातील आरोपी २८ मार्चला रात्री ६.१५ वाजता माटुंग्याच्या आंबेडकर रोडवरील गंगाविहार हॉटेल चौक येथे येणार असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते यांना माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहित व पोलीस पथक गंगाविहार हॉटेल चौक, आंबेडकर रोड, माटुंगा येथे रवाना झाले. हॉटेल बाहेर पथकाने सापळा रचला असता दोन संशयीत इसम ८ वाजता या ठिकाणी नमुद वर्णनाच्या टॅक्सीतुन आले. पोलीस पथकाने अतिशय हुशारीने या टॅक्सीला अडवुन कमीत कमी मुनष्यबळाचा वापर करुन दोन्ही आरोपींना तसेच ईको टॅक्सीसह ताब्यात घेवुन युनिट ३ च्या कार्यालयात आणण्यात आले. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली. तसेच गुन्हयात ईको टॅक्सी वापरल्याचे सांगितले. दोन्ही आरोपीतांची वैदयकीय तपासणी करून त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी शिवाजी पार्क पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. वीरेश प्रभु , पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) नीलोत्पल, सहाय्याक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण – मध्य) नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहित. सहाय्यक फौजदार गणेश गोरेगांवकर, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक आकाश मांगले, पोलीस नाईक राहुल अनभुले, पोलीस शिपाई तांबडे यांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींना अटक केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.