HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी

मुंबई | विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने त्यांनी वचननामा आज (१२ ऑक्टोबर) मातोश्रीमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी वचननामा जाहीर होण्यापूर्वी दसरा मेळव्यात १० रुपयात ताळी, १ रुपयात या आरोग्य सेवा हा त्यांच्या भाषणातून जाहीर केले होते. त्यानुसार १० रुपयांत चांगले सकस जेवण, हे स्वच्छ आणि व्यवस्थित असेल आणि त्यामध्ये विशेषत: एका किचनमधून वितरण आम्ही केले तरी महिला बचत गटांतील महिला त्यामध्ये सामावून घेतल्या जातील.”

या जाहिरनाम्यानुसार, “घरगुती वापरातील वीज ३०० युनिट पर्यंत आम्ही ३० टक्क्यांनी दर कमी करणार असे म्हटलेले आहे.” “राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातले एकही वचन खोटे ठरणारे नाही.” यापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. तर भाजपचा जाहीरनामा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा आणि मतदारांना आकर्षित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचा वचननाम्यातील महत्तावाचे मुद्दे

  • “आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने हा वचननामा महाराष्ट्राच्या जनेतेच्या चरणी समर्पित केलेला आहे-  उद्धव ठाकरे
  • शिवसेना आणि भाजप दोघे मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे सरकार चालवू आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ हे माझे वचन आहे.” – उद्धव ठाकरे
  • “जशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे, तशीच मुख्यमंत्री शहर सडक योजना बनने गरजेचे आहे. यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल.” – आदित्य ठाकरे
  • “आम्ही ५०००० किलोमीटरचे असे रस्ते काढले आहेत जे गावापासून तालुक्यापर्यंत जातात, ते बारमाही टिकतील असे रस्ते आम्ही बनवणार आहेत.” – आदित्याठाकरे
  • “शालेय शिक्षणासाठी गावापासून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बसेस नाही आहेत, त्यांच्यासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येईल.” – आदित्य ठाकरे
  • “गटप्रवर्तिका आहेत त्यांचे मानधन आम्ही वाढवणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही योजना आणलेली आहे, शिक्षणाबद्दल आमच्या योजना आहेत – उद्धव ठाकरे
  • “हा वचननामा बनवताना ५ वर्षांचा आपला जो काही फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा आणि लाखो लोकांचे प्रश्न घेऊन जन आशीर्वाद यात्रेत आणि दुष्काळी दौऱ्यात लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांचे एकत्रीकरण आणि संकलन करून वचननामा बनवलेला आहे. – आदित्य ठाकरे
  • दुर्बल घटक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष १०००० रुपये देणार, हे सगळं करताना अत्यंत जबाबदारीने विचार केलेला आहे.” – उद्धव ठाकरे
  • २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, त्यांना एका रुपयांत आरोग्यचाचणी आम्ही करतो.” – उद्धव ठाकरे
  • कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार
  • विद्यार्थ्यांसाठी गावागावात विशेष बससेवा सुरू करणार
  • राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे, पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही.
  • “घरगुती वापरातील वीज ३०० युनिट पर्यंत आम्ही ३० टक्क्यांनी दर कमी करणार  – उद्धव ठाकरे
  • १० रुपयांत चांगले सकस जेवण, हे स्वच्छ आणि व्यवस्थित असेल आणि त्यामध्ये विशेषत: एका किचनमधून वितरण आम्ही केले तरी महिला बचत गटांतील महिला त्यामध्ये सामावून घेतल्या जातील.” – उद्धव ठाकरे
  • जाहीरनाम्यात मी विचारपूर्वक वचने दिली आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

“अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच” किरीट सोमय्यांचा दावा!

News Desk

“महिलांवरील अत्याचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित केल्यास मोठ्ठा बदल घडू शकेल” – अ‍ॅड रमा सरोदे

News Desk