HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंच्या NIA कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ 

मुंबई | मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून मिळालेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझेंच्या पासपोर्टची चौकशी करायची असल्याने वाझेंची कोठडी वाढवून देण्याची मागणी एनआयएने विशेष कोर्टात केली होती. त्यामुळे कोर्टाने वाझेंच्या कोठडीत वाढ केली आहे.

सचिन वाझे यांची कोठडी आज (३ एप्रिल) संपल्याने त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी वाझेंचे वकील आणि एनआयएच्या वकिलांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने एनआयएच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहून वाझेंच्या कोठडीत पाच दिवसाने वाढ करण्यात आली आहे.

वाझेंच्या वकिलांचा युक्तीवाद

सचिन वाझे हे गेल्या २३ दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. त्यांना आणखी काही काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक होईल, असे वाझेंच्या वकिलांनी सांगितले. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे यांची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितले.

वाझेंना कोर्टाला द्यायचंय लेखी निवेदन

वाझेंना न्यायालयात लेखी माहिती द्यायची आहे. तुमच्या उपस्थितीत वाझेंना निवेदन लिहून द्यायचे आहे, असं वाझेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यावर तुमच्या अशिलाला जे काही सांगायचे आहे, म्हणायचे आहे. ते त्यांनी कोर्टाच्या नियमानुसारच सांगावे. आपले निवेदन लिहून न्यायालयात सादर करावे, असं न्यायाधीशांनी सांगितलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून सर्व स्पष्ट होईल

आतापर्यंत एनआयए सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे सचिन वाझे यांना कोंडीत पकडू पाहत होती. मात्र, आता वाझे यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा तब्बल १२० टीबी डेटा एनआयएकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करु शकत नाही, असं वाझेंनी कोर्टाला सांगितलं.

कसलीच कबुली दिली नाही

वाझेंनी बरेच आरोप कबुल केल्याचं एनआयएने गेल्या सुनावणीवेळी सांगितलं होतं. मात्र, आज वाझेंनी आपण कोणतीच कबुली दिली नसल्याचं सांगत एनआयएला कोर्टात तोंडघशी पाडलं आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणतीही कबुली दिलेली नाही. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असंही वाझेंनी कोर्टाला सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप आमच्यासोबत आली तर स्वागतच, मनसेची बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

News Desk

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

News Desk

जॉइन द चेंज’ तंबाखूमुक्त जनजागृती अभियानाला प्रारंभ

News Desk