HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईचे डब्बेवाले दोन दिवस सु्ट्टीवर जाणार

मुंबई | मुंबईकरांना वेळेवर जेवणाचे डबे पोहोचवणारे मुंबई डबेवाले शुक्रवार १२ व शनिवार, १३ जुलै असे दोन दिवसांची सुट्टी घेणार आहे. त्यामुळे दोन दिवस नोकरदार वर्गाला घरचे जेवण मिळणार नाही. आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी डबेवाले सुट्टी घेणार आहे.

आषाढी आणि कार्तिक एकादशी या दोन एकादशी डबेवाल्यांसाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे कार्तिक एकादशीला ते आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जातात आणि आषाढी एकादशीला ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. त्यामुळे आषाढी एकादशी व द्वादषीच्या दिवशी डबेवाले सुट्टी घेणार आहेत.

पंढरपूर येथे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत जेवढे वारकरी मुक्कामास येतात, त्या सर्वांची विनामूल्य राहाण्याची व द्वादशीच्या भोजनाची सोय डबेवाल्यांकडून दरवर्षी केली जाते. तशी सोय मुंबईचे डबेवाला संघटनेकडून यंदा देखील करणार आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी व शनिवारी मुंबईत डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला,” पोलिस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

फडणवीसांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी, भाजपच्या माजी आमदाराला मारहाण

News Desk

राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे महाराष्ट्रात तुफान

News Desk