HW News Marathi
महाराष्ट्र

Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरे आज (२८ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपद भूषविणार आहे. शपथविधीसाठी शिवसेनेकडून राज्यातील विविधी जिल्ह्यातील तब्बल ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

युवासेनाप्रमुख आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी काल प्रत्यक्ष भेट घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि शपथविधीचे निमंत्रण दिले. तर, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना शपथविधी सोहळ्याचे फोनवरुन निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय विविध राज्यांमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Live Update

 

  • सह्याद्री अतिथी गृहावर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे
  • राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे सिद्धिविनायक चरणी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत

  • राज्याच्या मुख्यमंत्रीचा शपथविधी सोहळा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रिपदाची शपथ घेतली

  • डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

  • राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली

  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली

  • शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

  • शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली

  • उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी उद्धव ठाकरे गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील शपथविधी सोहळ्यासाठी दाखल
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी मंचावर दाखल झाले आहे.
  • उद्योगपीत मुकेश आंबनीसह कुटुंबासहीत शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत
  • भाजपच्या सत्ता स्थापनेच्या दाव्याव सर्वच्च न्यायालयात महाविकासआघाडीची बाजू मांडणारे काँग्रेसचे नेते आणि वकिल कपिल सिब्बल देखील मंचावर उपस्थित आहे
  • माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह शिवतीर्थावर दाखल

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी, शिवसेना भवनला आकर्षक विद्युत रोषणाई
  • काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते मंडळी मंचावर दाखल झाले आहेत
  • काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जु खर्गे हे देखील मंचावर दाखल झाले आहेत
  • राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, परळीचे आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे
  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहू न शकल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नेते अजित पवार शिवतीर्थाकडे रवाना
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहेत.
  • पाच वर्षात स्थिर सरकार देणार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रगतीशील सरकार देणार – बाळासाहेब थोरात
  • शपथविधीनंतर महाविकास आघाडी सरकार कॅबिनेटची रात्री उशिरा बैठक होणार, आज रात्री आठ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडी सरकारची कॅबिनेट बैठक
  • महाष्ट्रच्या जनतेच्या हितासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत
  • ही आघाडी जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी असेल
  • महाविकासआघाडीची किमान-समान कार्यक्रमवरील पत्रकार परिषद
  • शेतकरी आणि सर्व सामन्या माणसे संकटात आहेत – शिंदे
  • राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही एकत्र आलो- शिंदे
  • महाविकासआघाडीचे सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे सरकार असणार आहे- शिंदे
  • किमान-सामना कार्यक्रमात धर्मनिरपेक्ष मूल्यांना प्राध्यान्य देणार – शिंदे
  • शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सरकार काम करणार – शिंदे
  • शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणार- शिंदे
  • सरकार स्थापन केल्यानंतर शेकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार- पाटील
  • धर्माच्या नावावर मतभेत केला जाणार नाही-शिंदे
  • सरकार बनू द्या, मगच बुले ट्रेनवर निर्णय घेऊन- पाटील
  • किमानसमान कार्यक्रमात धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख
  • किमान समान कार्यक्रमात १० रुपय थाळीचा उल्लेख
  • किमानसमान कार्यक्रमात- बेरोजगार तुरुणांना भत्ता देण्याची सुविधा असणार
  • शेतकऱ्यांना तातडीने कर्ज माफी देण्याचे माहविकासआघाडीचे आश्वासन

  • महाविकासआघाडीची पत्रकार परिषद सुरू
  • मुख्यमंत्र्यांसबोत ६ मंत्री शपथ घेणार असून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून २-२-२ मंत्री शपथ घेणार आहे.

  • मी आज शपथ घेणार नाही, मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
  • आजच्या शपथविधीमध्ये शपथ घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता त्याबाबत काहीही ठरले नाही, त्याची माहिती नाही असे त्यांनी सांगितले.

  • मी आणि सुप्रिया एकत्रच शिवतिर्थावर जाणार – अजित पवार
  • मुख्यमंत्र्यांसोबत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा शपथविधी आज होणार – अजित पवार
  • मी राष्ट्रवादीतच होतो आणि कायम राहणार – अजित पवार

  • उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिले आहे
  • महाविकासआघाडीची रंगशारदा येथेएकसूत्री कार्यक्रमावर तिन्ही पक्ष सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
  • राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एम के स्टालिन मुंबईत दाखल झाले आहे.

  • माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय, असे ट्वीट राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले

  • अजित पवारच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आज शपथविधी होणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे
  • राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळ फुलांनी सजविण्यात आले आहे

  • किती मंत्री आज शपथ घेणार हे मला माहिती नाही, मात्र, मला माहिती आहे की, मुख्यमंत्र्यांसबोत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेमधील काही नेते आज शपथ घेणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शिवतिर्थावर तयारीचा आढावा घेणार म्हटले आहे

  • सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा फोनवरून संपर्क अजित पवार संध्याकाळी साडे पाच वाजता सिल्वर ओकवर येणार तिथून सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र शपथविधी सोहळ्यासाठी जाणार
  • अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल, सकाळपासून घरी नसल्याची माहिती, नाराज असल्याची चर्चा

  • उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या वतीने अँटी डास फॉगिंग केले जात आहे.

  • उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला जाण्याबाबत अजून कोणताही निर्णय नाही – सोनिया गांधी

  • महाविकासआघाडीत अजित पवरांना काय पद दिले जाईल याचा निर्णय शरद पवार घेणार – संजय राऊत

  • ‘हाउज द जोश’… संजय राऊत यांचे नवे ट्विट

  • आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच ट्वीट

  • उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दादारमध्ये झळकले पोस्टर्स
  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार
  • उद्धव ठाकरेंनी दिला ‘सामना’च्या संपादकपदाचा राजीनामा
  • शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले!

News Desk

मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार!

News Desk

…तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल

News Desk