HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंगांचे भाजप नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधींची राजकीय वर्तुळात चर्चा!

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पाठवलेल्या पत्रामधून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसूल केल्याचा अतिशय गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे राजकारणात मोठा गदारोळ माजला. राष्ट्रवादीच्या गोटातही गोंधळ उडाला होता. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र, शरद पवारांनी त्यांचा राजीनामा होणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं.

परमबीर सिंग यांचे भाजपशी कनेक्शन?

दरम्यान, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.महत्वाचं म्हणजे, परमबीर सिंग आणि भाजपच्या एका नेत्यामध्ये असलेल्या नातेसंबंधांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. परमबीर सिंग हे भाजप नेते सागर मेघे यांचे व्याही आहेत. सागर मेघे यांच्या कन्या राधिका यांचा विवाह परमबीर सिंग यांचे पुत्र रोहन सिंह यांच्याशी झाला होता.

हा विवाह सोहळा २०१७ मध्ये बंगळुरू येथे झाला होता. त्यावेळी या विवाह सोहळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. हा विवाह सोहळा खूप महागडा होता अशी चर्चा होती. सागर मेघे हे विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत. दत्ता मेघे हे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. २०१४ नंतर त्यांनी आपल्या पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या या भाजप कनेक्शनमुळे या प्रकरणात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायलटच्या चूकीमुळचं फडणवीसांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं

News Desk

‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, पण…’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

News Desk

खासदार संभाजीराजे उद्या घेणार शरद पवारांची भेट ! मोदींनी टाळली होती भेट

News Desk