मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. या पाश्वभूमीवर राज्यातील मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद याठिकाणी हजारो आंदोलक एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने आंदोलकांनी सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे ग्रँट रोड परिसरात वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन पेटून नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
मुंबई ऑगस्ट क्रांती मैदानात आज (१९ डिसेंबर) ४ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. नागरिकत्व कायद्याविरोधात संपूर्ण देश पेटून उटला आहे. मुंबईतील आंदोलनात एनएसयूआय, छात्रभारती, एसएफआय, मसाला, एआयएसएफसारख्या १८ पेक्षा जास्त विद्यार्थी संघटना, टीस, आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी एकत्र येत नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, जामिया, एएमयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करत आहेत.
Actor Farhan Akhtar at August Kranti Maidan, Mumbai where protest against #CitizenshipAct is on: To raise your voice against something is democratic right, people are raising their voices & I'm of view that there seems to be a certain amount of discrimination in what is happening pic.twitter.com/97AYTnVaxO
— ANI (@ANI) December 19, 2019
आपल्या लोकशाहीविरुद्ध एखादी गोष्टी होत असेल तर आपण आवाज उठवला पाहिजेल, तो आपला हक्क आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात विरोद्ध होत आहे, असे अभिनेता फरहान अख्तर यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याचे मत मांडले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.