HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पालिकेत कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला

मुंबई | मुंबई महापालिकेत शिक्षण समिती निवडणूकीत कॉंग्रेसने महाविकास आघाडी आणि त्यांचे नाते पाळल्याचे दिसून आले. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आला. शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला. यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी असल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सर्व प्रकारामुळे महापालिकेतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे मनसूबे फोल ठरले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून कॉंग्रेसनं आज महापालिकेतील समित्यांच्या पहिल्या समितीच्या- शिक्षण समितीच्या निवडणूकीत अध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे संशयित रुग्ण, संपूर्ण परिसर सील

swarit

छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात

Aprna

…तर मला ही विधान परिषदेची ब्यादच नको, राजू शेट्टींची खदखद 

News Desk