HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शहांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा होणार शुभारंभ!

मुंबई। राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाचलेला असताना आता आपापल्या पक्षाकडून सभा त्याच बरोबर मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आज पासून चार दिवस महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आणि अशातच आता दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हे 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आणि याचवेळी अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या पक्षांनी रणनीती आखायला

तर अमित शहांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली.पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात इतर महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील महत्त्वाच्या पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि भाजप कडून देखील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आता अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात फोडला जाणार आहे.

आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं

सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप, दावे- प्रतिदावे हे पहायला मिळतात आणि अश्यातच मात्र आता भाजपकडून दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची आता बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना मात्र चांगलंच खडेबोल सुनावले. आपल्याला प्रखर विरोधी पक्षनेते बनायचं आहे. जूनपासून आपण काम करत आहोत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कामही सुरू केलं असून वेळोवेळी तुम्हाला कार्यक्रमही दिले आहेत, असा सज्जड दम आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…यामुळे २०२४ मध्ये मोदींची हकालपट्टी होईल’, लालू प्रसाद यादवांचा दावा!

News Desk

एल्गार परिषदेत महत्वाची भूमिका असलेल्या २ जणांना अटक

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

Aprna