पुणे | पुण्यातील मुस्लिम समाजाकडून रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम समाजाला दिले गेलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी गोळीबार मैदान ते विधानभवनापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या मूक मोर्चात नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक तैनात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे.
Maharashtra: Muslim Muk Morcha take out a protest march in Pune demanding 5% reservation for the community in jobs and education sector, among other demands pic.twitter.com/JfjhIuwhEl
— ANI (@ANI) September 9, 2018
मुस्लिम समाजाव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्तेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण कायम करावे त्याचप्रमाणे गोरक्षा, लव्ह जिहाद यासारख्या मुद्द्यांमुळे केवळ संशयावरून विनाकारण अनेक मुस्लिमांची मॉब लिंचिंगद्वारे झालेल्या हत्या या विरोधातही या मूक मोर्चात अनेक फलक दिसत आहेत. दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात तसेच मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे या मागण्यादेखील या मोर्चामार्फत केल्या जात आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.