HW News Marathi
महाराष्ट्र

“अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” – राज ठाकरे

पुणे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला गायिका आशा भोसले मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप नेते आशिष शेलार महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशा वेगळ्या शैलीत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हास्यमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं.

अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो

यावेळी मात्र राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. खरं तर गेल्याच महिन्यात राजकीय दौऱ्यावर असताना राज ठाकरे पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्याही भेटीला गेले होते. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे राज ठाकरेंनी पहिल्यांदाच घातलेल्या मास्कच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु आजच्या जन्मशताब्दी सोहळ्यात व्यासपीठावर बहुतांश मान्यवरांनी मास्क घातला नव्हता. मात्र मास्कधारी प्रेक्षकांना संबोधताना राज ठाकरेंनी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” असं म्हणत भाषणाला सुरुवात केली.

वर्तमानात भानावर यायला शिकवतात

सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो. आता मला त्यांच्या सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात, इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणार इतिहास बाबासाहेब सांगतात” अशा शब्दात राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचे कंगोरे उलगडले.

राज ठाकरेंकडून आशाताईंच कौतुक

राज ठाकरे म्हणाले, कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत…. या वयातही काय दिसतात ना… अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु होती… मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसलेत… आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे…याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या शैलेश जोशींची आत्महत्या

News Desk

RBIच्या संचालक होण्याच्या आमदार, खासदारांच्या प्रतिबंधाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रीया

News Desk

डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, राजू पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk