HW News Marathi
महाराष्ट्र

‘कराड यांच्यापेक्षा माझी उंची खूप मोठी’, चंद्रकांत खैरेंची दानवे, कराडांवर शेलक्या शब्दात टीका!

औरंगाबाद। शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करतानाच खैरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांच्यापेक्षा माझी उंची खूप मोठी आहे. त्यांची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

मीच त्यांना महापौर केलं

चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं खैरे म्हणाले.

दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले

मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.

मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे

शिवसेनेला काटशह देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं असेल तर चांगलं आहे. बरं आहे ना उलटं. ते दिल्याने आमच्याही लक्षात येतं. आमचे कार्यकर्तेही खडबडून जागे होतात आणि कामाला लागतात. त्यांना लोकसभेचं तिकिट दिलं तरी काहीच हरकत नाही. शिवसेनेची ही जागा आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. युतीतही शिवसेनेची जागा होती. महाविकास आघाडीतही शिवसेनेचीच जागा आहे, असं सांगतानाच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात झाली कागदपत्रांची फेकाफेकी…!

News Desk

मुख्यमंत्र्यांनी केले वर्ल्ड इकोनॉमिक फोरम च्या निर्णयाचे स्वागत

News Desk

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

News Desk