HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांचा खळबळजनक खुलासा

मुंबई | सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार विद्या चव्हाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाणांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान, विद्या चव्हाण म्हणाल्या की, “माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट विद्या चव्हाण यांनी केला आहे. सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबध असल्याचे आमच्या निदर्शनास आले. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकिलांशी संपर्क साधला. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे याबाबत मी जास्त बोलणार नाही,” अशी प्रतिक्रियाही विद्या चव्हाण यांनी दिली.

विद्या चव्हाण त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने तिचा छळ करण्यात येत होता.

विद्या चव्हाण यांच्या सुनेने विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा! – मुख्यमंत्री

Aprna

अभाविपचे सेल्फी विथ कॅम्पस अभियान, महिला सशक्तीकरणासाठी ‘मिशन साहसी’

News Desk

दिल्लीत बॅगमध्ये सापडला IED बॉम्ब; मोठा अनर्थ टळला

Aprna