HW News Marathi
महाराष्ट्र

“ना डरुंगी ना झुकुंगी”, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. भाजपने आधी पाठराखण केली मात्रनंतर तिच्या वक्तव्याचा निषेध देखील केला. शिवसेने तिच्याविरोधात जोडेमारो आंदोलनही केले. वेगवेगळ्या स्तरांवरून कंगनाने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि अजूनही केला जात आहे. आज कंगना मुंबईत आल्यानंतर नक्की काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान कंगना राणावत हीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ती मुंबईकडे रवाना झाली आहे.

आज (९ सप्टेंबर) कंगना राणावत मुंबईमध्ये येत आहे. आणि येण्याआधी तिने पुन्हा एक ट्विट केले आहे. कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी तिला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून ‘वाय’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी’, असे ट्विट कंगनाने केले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1303507485160947712?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा’!

News Desk

अनिल परबांची ईडी कडून चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी पूर्ण करायला तयार- अब्दुल सत्तार

News Desk

विरोधक कुठे आहेत?विरोधक तर बिहार मध्ये आहेत! महाराष्ट्राच्या संकटाच्या काळात शरद पवार धावून येतात–धनंजय मुंडे

News Desk