HW News Marathi
महाराष्ट्र

रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनाने समर्पित लोकप्रतिनिधी हरपला –  नाना पटोले

मुंबई | नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभा सदस्य रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला, अशा शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अंतापूरकर देगलूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क होता.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी आपण रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आजारपणावर मात करून ते पुन्हा लोकसेवेला सुरुवात करतील अशी अपेक्षा होती पण शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंतापूरकर यांच्या निधनाने काँग्रेस परिवार एका निष्ठावान कार्यकर्त्याला मुकला आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतापूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोकणात कायमची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचा मानस’, वीजवाहिन्या भूमिगत करणार विजय वडेट्टीवार!

News Desk

ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू! – सुप्रिया सुळे

Aprna

हिंगोलीत मराठा आंदोलकांनी पेटवली पोलीस गाडी

News Desk