HW News Marathi
Covid-19

मोफत लसीकरणाच्या राज्याच्या निर्णयाचे स्वागत, मोहिम सुरुळीत पार पडावी !

मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा घेतलेला निर्णय रास्तच असल्याचे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रावर गर्दी न होता ही मोहिम सुरुळीत पार पडावी यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले यासंदर्भात बोलताना म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लस ही सर्वांना मोफत द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मोफत लसींसाठी आग्रही भूमिका मांडत पाठपुरावाही केला. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच प्रभावी शस्त्र आहे. जगभरातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात असताना केंद्र सरकार मात्र त्याबाबत चालढकल करत होते.”

केंद्राने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला लसींचा मुबलक पुरवठा करावा !

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ” अखेर केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याची जबाबदारी मात्र राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वा-यावर सोडले आहे. पण महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मात्र सोनियाजी गांधी यांची मागणी मान्य करून मोफत लसीकरणाचा निर्णय घेऊन जनतेप्रति आपली बांधिलकी जपली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेले असतानाही राज्य सरकारने नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घेऊन एकीकडे कोरोनारुग्णांवर योग्य उपचार तर दुसरीकडे व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेतली. आता केंद्र सरकारने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला लसींचा मुबलक पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी”, असे नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात आज १५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

News Desk

राज्यात आज ७,९७५ नवे रुग्ण, तर २३३ जणांचा झाला मृत्यू

News Desk

पोलीस आयुक्त झाले ‘मियाँखान’, वेशांतर करून पोलीस ठाण्यांवरच टाकल्या धाडी, पुढे घडलं असं की…!

News Desk