HW News Marathi
राजकारण

“भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य”-नाना पटोले

नवी दिल्ली | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान केले. यावेळी रावसाहेब दानवे देखील मंचावर होते. त्यावरून आता तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आघाडी सरकार आल्यापासून भाजप ताणतणावत आहे

आघाडी सरकार आल्यापासून भाजप ताणतणावत आहे. त्यामुळे भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं असेल. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे, असं कमिटमेंट आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिले आहे. त्यामुळे आमचं सरकार देखील स्थिर आहे. पण, उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असेही नाना पटाले म्हणाले. ‘माजी मंत्री म्हणू नका’, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटलांना दिवस स्वप्न पडले असावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केलं.

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे देखील समजले होते. याबाबतही पटोले यांनी माहिती दिली. के. सी. वेणुगोपाल यांना संघटनात्मक कामकाजाची माहिती देण्यासाठी आलो आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यात वेगवेगळे प्रश्न घेऊन जाणार आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk

आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयला बंदी

News Desk

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अन् इकडे भाजपचे सेलिब्रेशन सुरू

Aprna