HW News Marathi
Covid-19

अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण!

मुंबई | महाराष्ट्राचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अगदी तीन दिवसांवर आले असतानाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहेत. नाना पटोले यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली होती.त्यानंतर आपला रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.येत्या ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. मात्र, अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाल्यावर आता अधिवेशन कसे होणार हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

नाना पटोले यांच्या अनुपस्थितीत पावसाळी अधिवेशन अध्यक्षांऐवजी चालवले जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष हे पावसाळी अधिवेशन चालवणार आहेत.विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी सगळे आमदार, मंत्री, अधिकारी, विधिमंडळातले कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच त्यांना अधिवेशनात प्रवेश मिळणार आहे. तसंच विधिमंडळात येण्यासाठी प्रत्येकाला प्रवेशिकेसोबतच आपला कोरोना रिपोर्टही सोबत ठेवावा लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारच्या सहा महिन्याचा लेखा-जोखा

News Desk

शरद पवारांनी घेतला पुढाकार ! ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडवण्यासाठी ‘या’ सूचना

News Desk

ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

News Desk