HW News Marathi
महाराष्ट्र

इंदापूरमध्ये पुढचा आमदार काँग्रेसचा, नाना पटोलेंचा एल्गार, अजित पवारांचं वाढलं टेन्शन!

विजय शिंदे, इंदापूर | इंदापूर तालुक्यातील पुढील आमदार हा काँग्रेसचाच असेल असे ठाम मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. इंदापूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यातील पोटनिवडणुकीसाठी प्रचार सभेसाठी नाना पटोले इंदापूर येथे आले होते. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की इंदापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे .एकेकाळचा हा बालेकिल्ला होता परंतु काही लोक काही कारणाने आपल्याला सोडून गेले. परंतु ज्यांची काँग्रेस पक्षावर निष्ठा आहे त्यांना काँग्रेस पक्षाचे विचार मान्य आहेत अशा नेत्यांनी परत माघारी फिरावे ,त्यांना काँग्रेस पक्षात सन्मानाने स्थान दिले जाईल.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघाचा आमदार हा कॉंग्रेस पक्षाच्या असेल. यावरून इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे इंदापूर तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून ते राज्याचे विद्यमान राज्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी कट होऊन काँग्रेस पक्षाला कशी उमेदवारी मिळेल..? यावरच चर्चांना ऊत आला आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले हे येणाऱ्या २०२४च्या विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना पक्ष स्वतंत्र व निवडणुका लढवणार का.? असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने मराठी भाषेचा पर्याय आणा अन्यथा मनसे स्टाईलने सण साजरा होईल!

News Desk

नागपुरात भाजपला मोठा धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द

News Desk

लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

Aprna