HW News Marathi
महाराष्ट्र

“राजभवनामधून भाजपचे कार्यालय सुरु”, नाना पटोलेंचा राज्यपालांवर गंभीर आरोप

मुंबई। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यातील कुरघोडी सगळ्यांना माहित आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्यातील हिंदुत्वाचा मुद्दा अजूनही राजकीय वर्तृळात चर्चेत असतोच. अशात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर शिक्कामोर्तब न झाल्याने ठाकरे सरकारमधील नेते राज्यपालांवर टीका करताना दिसत आहेत. या सगळ्यात आता विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर अनेक प्रतिक्रिया सराकरमधून येत आहेत.

याच विषयाला धरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर आपला निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना ही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिले. त्याची दखल घेवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले.

विधानसभा अध्यक्ष पदाबाबत निर्णय हायकमांड घेणार

यावेळी पटोले यांनी विधानसभा अध्यक्षापदाबाबतही भाष्य केलं. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आहेत. ते राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर अध्यक्षपदाचं नाव हायकमांडकडे पाठवलं जाईल. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर याच विषयावरुन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं म्हटलं की कॉंग्रेसने आपला उमेदवार सांगावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ.

मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करतंय

‘अॅड. परमार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप केले होते. त्यावेळी ईडी किंवा सीबीआय आडवी येत नव्हती. फडणवीस त्यावेळी प्रत्येकाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देत होते, असं सांगतानाच सध्या मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना बोथट करण्याचे पाप करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला आहे. आता यावर भाजपकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोडांवर शरद पवार नाराज? पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार! – राजेश टोपे

Aprna