HW News Marathi
महाराष्ट्र

पटोले म्हणतात, वेळ आली तर मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पाहणार नाही !

अमरावती | महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. सध्या नाना पटोले विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना निवडणुकीवर अनेक महत्त्वाची वक्तव्ये केल्याचं दिसून आलं. नाना पटोले हे विदर्भातल्या काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. काल ते अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघात होते. मंत्री यशोमती ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात.

नाना पटोले हे आगामी निवडणुकांसाठीची काँग्रेसची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाचं कौतूक करताना पटोले म्हणाले की, तुम्हाला मी विधानसभेत गेली अनेक वर्ष पहातोय. ह्या भागाच्या लोकांसाठी सातत्यानं भांडणारी रणरागिनी आम्ही पाहिली. वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पहात नाही. जे लीड आपल्याला मिळालं, त्यापेक्षा जास्त मतानं आपला उमेदवार ह्या भागातून निवडुण यायला पाहिजे.

याच कार्यक्रमात नाना पटोले यांनी नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात निवडणुकाच निवडणूका असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तयारी करावी असं सांगायलाही पटोले विसरले नाहीत. विशेष म्हणजे मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवश्याला काँग्रेसचं संघटनात्मक मॉडेल म्हणून तयार करावं, जे संपूर्ण महाराष्ट्रात राबवता येईल अशी अपेक्षाही पटोले यांनी संबोधनात व्यक्त केली. सर्वात महत्वाचं म्हणजे 2024 साली ग्रामगीतेच्या आधारावर सरकार चालवू अशी घोषणाही पटोलेंनी केली आहे. ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा महान ग्रंथ मानला जातो.

नानांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा केली जाहिर!

नाना पटोले काल अकोल्यात होते. तिथं त्यांनी एका सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. आधीच आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन घमासान सुरु आहे. त्यात नानांनी इच्छा बोलून दाखवल्यानंतर आघाडीच्या राजकारणात चर्चेला ऊतच आला. त्याही कारणामुळे नाना पटोले कालपासून चर्चेत आहेत. नाना पटोलेंची ही आक्रमकता प्रत्यक्षात काँग्रेसला किती यश देते हे पहाणेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण नानांच्या महत्वाकांक्षेची राष्ट्रवादी काँग्रेसनं खिल्ली उडवलीय तर त्यांचेच विदर्भातले सहकारी विजय वडेट्टीवार यांनी मिश्किलपणे शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ही’ शिवसेनेची मजबुरी आहे काय ?, प्रवीण दरेकरांचा सवाल 

News Desk

‘तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत’, भुजबळांचं सोमय्या यांना प्रत्युत्तर!

News Desk

परळी मतदार संघातील रस्त्यांच्या विकास कामांवरून मुंडे बहीण-भावातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Aprna