HW News Marathi
महाराष्ट्र

“प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका”

अमरावती | राज्यात सध्या अनेक घान सुरु आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्षाचा महत्वाचा नेता आपला पक्ष वाढवण्यासाठी दौरे करत आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही विदर्भ दौऱ्यावर आहे. आज (१२ जून) नाना पटोले अमरावतीत असताना त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले आहे.येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.

शिवशाहीला नव्हे पेशवाईला धक्का बसेल – नाना पटोले

नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल”

केंद्राकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ

कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाही. आज राज्यात 50 हजार पोस्ट कोव्हिडचे रुग्ण असताना, केवळ चार ते पाच हजार इंजेक्शन देतात. बाहेर या इंजेक्शनचा काळा बाजारा केला जातो. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाशी काहीही घेणे देणे नाही. ते सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत आहेत, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत

दरम्यान, नाना पटोले यांनी काल अकोल्यात बोलताना, प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत दिले होते. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच !

News Desk

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा; केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडला १७,५०० कोटींची भेट!

Aprna