HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय समीकरण बदलताना दिसली की शरद पवार भूमिका घेतात – नाना पटोले

मुंबई। देशाच्या राजकरणात मोठीच घडामोड होत असल्याचं चित्र पाहायला मिळतय राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. त्यानंतर शरद पवार (२२जून) ला मंगळवारी १५ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार असल्याचं सध्याच वृत्त आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

शरद पवार हे भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना विचारलं. यावर बोलताना शरद पवारांचा पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगवेगळे वारे वाहू लागतात त्या वेळी शरद पवार अशा भूमिका घेतात, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शरद पवारांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. त्यामुळे याला काही नवीन म्हणणं हे चुकीचं असल्याचंही पटोले म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आणि प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही आपली प्रतिक्रिया दिलीये.

कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्यानं मारतील, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. यावर, स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?, असं नाना पटोले म्हणाले.

दिल्लीत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग!

देशात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार काल (२० जून) दिल्लीला रवाना झाले आहेत. ३ दिवसांचा त्यांना दिल्ली दौरा असणार आहे. दरम्यान, या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यांना भेटणार याची चर्चा सध्या सुरु आहे. अशात आज(२१ जून) राजकीय रणनितिकार प्पशांत किशोर दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. या आधी ११ जूनला शरद पवार यांच्या मुंबईच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. या त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, मुंबईतील त्यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती होती असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आजच्या प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीचा नेमका अर्थ काय आहे हे समजणं महत्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर २६ सप्टेंबरला सुनावणी

News Desk

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर समीर वानखेडेंविरोधात घोषणाबाजी

News Desk

अभिनेत्री मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला, पती राज कौशल यांचे झालं निधन

News Desk