HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड पोलिसांकडून अट्टल वाहनचोरास अटक, पाच वाहन जप्त

उत्तम बाबळे

नांदेड :- नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने विदर्भातील मोटार सायकली चोरुन आणून मराठवाड्यात विकणा-या आर्णी तालुक्यातील एका अट्टल मोटार सायकल चोरास विक्रीसाठी चोरुन आणलेल्या पाच मोटार सायकलीसह सारखणी फाटा येथे पकडले असून सिंदखेड पोलीसांत त्याच्या गुन्ह्याची नोंद घेऊन पुढील तपासासाठी यवतमाळ जिल्हा पोलीसांच्या स्वाधिन करण्याची रितसर प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पथकाचे प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर व पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर,जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते हे दि.२३ जून २०१७ रोजी जिल्ह्यातील माहूर,सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की,माै.सारखणी परिसरात एक इसम चोरीच्या मोटार सायकली विक्रीसाठी घेऊन येत आहे. यावरुन त्याचा शोध घेतला असता सायंकाळी किनवट रस्त्यावरील वनखात्याच्या चाैकशी नाक्याच्या पाठीमागे काही अंतरावर सारखणी फाटा जंगलातील एका झाडाखाली पाच मोटार सायकली घेऊन बसलेला एक इसम आढळून आला.त्यास या पथकाने जेरबंद केले व चाैकशी केली असता त्याने दत्ता सुरेश लिंगलवार ( ४५), रा.सदोबा सावळी,ता.आर्णी जि.यवतमाळ ,ह.मु.गंगाजीनगर ,माहूर जि.नांदेड असे सांगीतले.त्याच्या जवळील एक स्कुटी व चार हेरो होंडा स्प्लेंडर प्लस अशा एकूण पाच मोटार सायकली अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या मुद्देमालासह त्यास सिंदखेड पोलीस ठाण्यात आणून अधिक चाैकशी केली असता त्याने सांगीतले की मी या मोटार सायकली वडगाव, दत्तचाैक,बस स्थानक जि.यवतमाळ येथून काही दिवसापुर्वी चोरी केलेल्या आहेत व आता त्या इकडील काही व्यक्तींना कमी किमतीत विकणार होतो.तसेच त्याने यापुर्वी ही माै.दहेली ता.किनवट येथील नामे मोसिम यास ४,इम्रान यास ४,गुड्डू यास २,छोटू यास १ अशा एकूण ११ चोरीच्या मोटार सायकली कमी किमतीत विकलो आहे अशी कबूली दिली. दत्ता सुरेश लिंगलवार ( ४५), रा.सदोबा सावळी,ता.आर्णी जि.यवतमाळ ,ह.मु.गंगाजीनगर ,माहूर जि.नांदेड हा अट्टल चोर माहूर येथे राहून विदर्भातील चोरलेल्या मोटार सायकली किनवट,माहूर,दहेली,सारखणी,व मराठवाड्यात कमी किमतीत विकतो.याचे जाळे दुरवर पसरल्याचे या छाप्यातून उघडकीस आले असून सदरील कारवाईची नोंद सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांच्या फिर्यादीवरुन सिंदखेड पोलीसांत घेण्यात आली आहे.तसेच याबाबद यवतमाळ जिल्हा पोलीस,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आदींना माहीती देण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यास यवतमाळ पोलीसांच्या स्वाधिन करण्याची रितसर प्रक्रिया सुर होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सहयाद्री अतिथीगृह येथे सत्कार

News Desk

कोरोना’च्या जगजागृतीसाठी लावलेली कॉलर ट्यून त्वरीत बंद करा – बाळा नांदगावकर

News Desk

आजपासून विधिमंडळाचे २ दिवसीय पावसाळी अधिवेशन होणार सुरू

News Desk