HW News Marathi
महाराष्ट्र

“मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही?”, नारायण राणेंचा सवाल

चिपळूण | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द काढल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण पेटलं आहे. नारायण राणे यांनी या अटकेवरून त्यांचं मत व्यक्त केलं आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही

नारायण राणे यांनी गुन्हा दाखल केल्यावर आता नारायण राणेंनी त्यांच मत स्पष्ट केलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला आहे.

दगडफेक करण्यात पुरुषार्थ नाही

माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा कोण शिवसेना. एखाद्या नेत्याचं नाव सांगा. कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही. माझी बदनामी करायला घेतली तर माझा गुन्हा तुमच्याविरोधात दाखल करणार आहे. मी सारखं पाहतो. हे निघालं ते निघालंय… काय चाललं नाही. मी तुमच्या बातमीवर, सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारले हा पुरुषार्थ होत नाही. त्यांना जे काही करायचं ते करू दे. काय पुरुषार्थ आहे ते पाहू, असंही ते म्हणाले.

मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?

नारायण राणे यांनी या सगळ्या प्रकरणात त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं राणे म्हणाले आहेत.

मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेना भवन फोडू असं लाड म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही? असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

15 ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dongri Building Collapsed : दोषींवर कठोर कारवाई करणार !

News Desk

…आणि छगन भुजबळ, फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

News Desk

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या! – अजित पवार

Aprna