HW News Marathi
महाराष्ट्र

दगडफेक करण्यात पुरुषार्थ नाही, कुठली शिवसेना? मी ओळखत नाही!

चिपळूण | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले असून नाशिक आणि पुणे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी नाशिक साठी रवाना झाले आहेत. या सगळ्यावर नारायण राणे यांनी आपलं मौन सोडलं आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही, पोलीस पथक निघाले, अटक होणार, नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला, शिवसेना कोण, एखाद्या नेत्याचं नाव सांगा, कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही, माझी बदनामी कराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रश्नकर्त्या पत्रकारांनाच दिला आहे.

मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?

नारायण राणे यांनी या सगळ्या प्रकरणात त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं राणे म्हणाले आहेत.

मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेना भवन फोडू असं लाड म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही? असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

15 ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने युवासेनेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंवर गुन्हा दाखल

नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत अटक करण्यासाठी पोलिसांची टीम तयार आहे. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, तपास अधिकारी आनंदा वाघ यांच्या अध्यक्षतेत टीम कारवाई करणार आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे घेणार मेळावा, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

मुख्यमंत्री पुन्हा एकदा घेणार श्रीरामांच दर्शन

swarit