HW News Marathi
Covid-19

समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! नारायण राणेंचा संभाजीराजेंवर घणाघात

मुंबई । संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भाजपची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढरीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं. मला संभाजीराजेंचा फोन आला होता. पण आमची भेट झालेली नाही.

“संभाजीराजेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता मी मागेही म्हटले होते की राजेंनी आता राजीनामा देऊ नये. महाराजांचे नाव लागतं त्यांच्या नावाला म्हणून भाजपने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली होती. ती खासदारकी संपत असताना आता राजीनामा देऊ नये”, असा सणसणीत टोला नारायण राणे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लगावला आहे. दरम्यान, संभाजीराजे आता नारायण राणेंच्या या टीकेला प्रत्यत्तर देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

शरद पवारांवर टीका करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा

नारायण राणेंनी पुढे पुन्हा शरद पवारांवर टीका करताना शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले कि, “शरद पवारांनी तर ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. तरीही पवारांनी मराठा समाजासाठी काहीही केले नाही. म्हणजे त्यांचा ह्यात दोष आहे हे स्पष्टच आहे ना. शरद पवार मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना का काहीच करायला सांगत नाहीत? नुसते गप्प आहेत. आताही शरद पवारांनीच बनवलेलं सरकार आहे. नाहीतर हे सरकार अशक्यच होतं. नाहीतर उद्धव ठाकरे आयुष्यात मुख्यमंत्री होणं नव्हतं.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संक्रमित रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर

News Desk

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात ना ॲाक्सिजन,ना बेडची कमी…जिल्हाधिकाऱ्यांच होतयं कौतुक

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे मानखुर्दमध्ये राबवणार ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’

News Desk