HW News Marathi
देश / विदेश

‘नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट, कोकणवासियांसाठी तीन महत्त्वाच्या मागण्या’

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनयात्रा जोमात सुरु झाली आहे. कोकणात शिवसेनेला शह देण्याच्यादृष्टीने भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना बळ दिले जात आहे. केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नारायण राणे त्यादृष्टीने कामालाही लागले आहेत. नारायण राणे यांनी शनिवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडले आहेत.

कोकणासाठी मागणी

नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशा मागण्या नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव त्या पूर्ण करणार की नाही, हे पाहावे लागेल.

मात्र, यानिमित्ताने नारायण राणे यांनी कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून राजकीय फासे टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह कोकणात आले होते. त्यामुळे नारायण राणे यांचे भाजपमधील राजकीय वजन वाढले होते. तर काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्याकडे लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे आता खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत.

महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत

राज्यसरकारच्या कामावरून नारायण राणे त्यांना नेहमीच सुनावत असतात. यावेळेस त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढणार असल्याचं बोले आहेत. “महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन”, असं यावेळी राणे म्हणाले आहेत.

तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा लग्न सोहळा, कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk

रोटोमॅकचा ८०० कोटीचा घोटाळा

News Desk

“आम्ही हवतर त्यांना बँडबाजा पुरवतो…पण गुजरातचं सरकार बरखास्त का केलं नाही?” 

News Desk