HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंनीं संजय राऊतांच्या “त्या” फोटोची उडवली खिल्ली!

नवी दिल्ली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर राऊत आणि गांधी यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे

नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. काँग्रेस आता कुठे आहे का? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं राणे म्हणाले.

संजय राऊतांना तशी वाईट सवयच

दैनिक ‘सामना’मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या बातम्या येत आहेत. त्यावरूनही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काहीच काम केलं नाही. त्यामुळे ‘सामना’कडे छापण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे ते भाजपबद्दलच्या बातम्या देत असतात. संजय राऊतांना तशी वाईट सवयच आहे. लोकांना सांगण्यासाठी सामनाकडे काहीच नाही, असं सांगतानाच पक्षाध्यक्ष बदलण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही. यात कुठलं राजकारण नाही. बदला बदली नाही किंवा मोर्चेबांधणीही नाही, असं राणेंनी स्पष्ट केलं.

राज्य अधोगतीकडे चालंलय

सव्वा महिना झाला. राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी 16 तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे. राज्य अधोगतीकडे चालंलय. त्यामुळे लोकांना जागृत करणार आहे, असं सांगतानाच परत चिपळूणला जाणार असून पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या गेल्या केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने केवळ दहा हजार रुपये दिले. लोकांनी ते पिंपात टाकले. आता ते फुगून बाहेर येतील, अशी टीका त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही !

News Desk

मी काँग्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या पक्षाबाबत बोलावं, साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

News Desk

पिण्याच्या पाण्यावरुन विधानसभेत गदारोळ, कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब

News Desk