HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंचा डंका ! मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत,यादीतही पहिलचं नाव…

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.

राणे रांगेतही पहिले आणि यादीतही पहिले

केंद्रीय विधिमंडळाची नावं घोषित झाल्याच्या नंतर सध्या एकाच फोटो सोशल मीडियावर गाजतोय. या फोटोत प्रत्येक जण स्वत:च्या ओळखीचा, प्रदेशातला, भाषेचा, माहित असलेल्या मंत्र्याचा चेहरा शोधतोय. या बैठकीत खरं तर मराठी माणूस महाराष्ट्र शोधतोय. त्यातही चर्चा नारायण राणेंची असेल तर मग त्यांना शोधलंच जाणार. राणे कुणाचं तरी असं एकदम शिस्तीतल्या मुलासारखं तेही पहिल्या रांगेत बसून ऐकतायत हेच महाराष्ट्राला सुखावणारं आहे. दुसऱ्या फोटोत मात्र राणे स्पष्टपणे दिसतात. पहिल्या फोटो मोदी बसून बोलतायत तर दुसऱ्यात ते माईक

घेऊन उभे आहेत. दुसऱ्या फोटोत पहिल्या रांगेत नारायण राणेंना स्थान आहे. ते पहिल्या खुर्चीवर आहेत. मंत्रिमंडळाच्या यादीत देखील नारायण राणे यांचं नाव पाहिलं आहे.

अमित शहांसोबत चांगले संबंध

अमित शाह यांनी काही महिन्यांपुर्वीच राणेंच्या सिंधुदुर्गात येऊन त्यांच्या हॉस्पिटलचं उदघाटन केलेलं होतं. त्यावेळेसही राणेंवर शाहांनी स्तुतीसुमनं उधळली होती. आता त्यानंतर राणेंची थेट मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागतेय. याआधी कोकणातून मोदींच्या मंत्रीमंडळात सुरेश प्रभू होते. शिवसेनेचेही नेते होते पण भाजपचे म्हणाल तर प्रभूनंतर राणेच. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलंय. त्यामुळे प्रशासनाचा त्यांच्याकडे अनुभव आहेच. केंद्रातही मोदींना त्यांचा फायदा होईल. महाराष्ट्रातही भाजपला राणेंचा फायदा होईल यात शंका नाही. कारण शिवसेनेला डिवचायला राणेंशिवाय दुसरा कोण असेल?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk

कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल! – जितेंद्र आव्हाड

Aprna

आमच्या भेटीचे वेगळे अर्थ काढू नका !

News Desk