HW News Marathi
महाराष्ट्र

“आज बाळासाहबे असते तर म्हणाले असते…..”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनयात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु करण्याआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, “”साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही

नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला टोलाही लगावला आहे. ते म्हणाले, ” शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं सरकार येईल”, असा विश्वास यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

साहेब तुम्ही हवे होता!

मी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो, नमस्कार केला आणि सांगितलं साहेब तुम्ही आज हवे होते, मला आशीर्वाद देण्यासाठी. मला जे काही मिळालं ते साहेबांमुळे. मला साहेबांनीच घडवलंय, आजही ते असते तर म्हणाले असते नारायण तू असेच यश मिळव, माझा आशिर्वाद आहे.आणि डोक्यावर हात ठेवला असता. आज हात डोक्यावर नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. त्यामुळे कुणाही दैवताचं स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करु नये, भावनांचा विचार करावा, त्यानंतर वक्तव्य करावं, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिजेत

नारायण राणे यांची जनयात्रा चालू असताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे.

त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकंल, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही, असे राणेंनी म्हटले. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीपद दिलं, त्यामुळे मला आपली सोबत हवीय, असेही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळेच दोषी सुटले आणि बाबरी फाईल बंद, मग बाबरी पाडली कोणी? – सामना

News Desk

फलटणमध्ये शॉक लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू

News Desk

“गद्दार त्यांचं काय चाटत आहेत माहिती नाही”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

Aprna