HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचा कोणता प्रश्न सरकारने सोडवला? नारायण राणेंचा मराठा आरक्षणावरून ठाकरेंना टोला

मुंबई | अनेक विषयांवरुन सतत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या नारायण राणे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागले आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारला सुनावले आहे. राज्याचा कोणता प्रश्न सरकारने सोडवला? असा सवाल उपस्थित करत राणे यांनी राज्य सरकारने मराठी आरक्षणाची जबाबदारी झटकण्याचं काम केलं, असे म्हटले. राणे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून, सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणे शक्य नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर तमाम मराठा समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली होती. राणे म्हणाले, मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काय तयारी केली होती? मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार जबाबदारी झटकतंय. राज्याचा कोणता प्रश्न सरकारने सोडवला, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. तीन पक्षांच्या सरकारने कोर्टात नीट बाजू मांडली नाही. केंद्राकडे बोट दाखवून प्रश्न सुटत नाहीत. आरक्षण रद्द झाल्याचा राज्य सरकारला आनंदच झाला असेल. घटनेत असणारं असं योग्य आरक्षण भाजप सरकारने दिलं होतं. आता मराठा समाजानं राज्य सरकारला आरक्षणासाठी भाग पाडलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. इतर राज्यांना आरक्षण देणं जमतं आपल्या राज्य़ाला का नाही, असेही ते म्हणाले.

नारायण राणे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. आताच्या मंत्र्यांना फक्त पद टिकवायचं आहे. मराठा समाजाने वेगवेगळे गट-तट करण्यापेक्षा एकत्र येणं गरजेचं आहे. आरक्षण देणं हे मुख्यमंत्र्यांचं कामचं आहे. पण, आरक्षणाची जबाबदारी केंद्राची सांगत राज्य सरकार जबाबदारी झटकत आहे, असेही राणे म्हणाले आहेत.

Related posts

देशात ३१ ऑगस्टपर्यंत ‘अनलॉक ३’, ‘कंटेन्टमेंट झोन’मध्ये पुन्हा नियम कडक

News Desk

पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री !

News Desk

लाडक्या धोनीला राजकीय नेत्यांनी देखील दिल्या निवृत्तीच्या शुभेच्छा!

News Desk