HW News Marathi
महाराष्ट्र

सातारा हद्दवाढीचा ५० वर्ष जुना विषय अखेर सुटला, शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश!

सातारा | भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारच्या हद्दवाढीची काढलेली ऑर्डर शिवेंद्रराजे भोसले यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. जवळपास ५० वर्ष जुना प्रश्न मिटल्याने सातारकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

या निर्णयामुळे भविष्यात सातारा ही महापालिका होण्यासाठी मदत होईल, या निर्णयाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. ग्रामपंचायत आणि दोन ग्रामपंचायतींचा अंशतः भाग यात समाविष्ट करण्यात आला आहे. तत्कालिन सहकार मंत्री कै.अभयसिंहराजे भोसले यांनी शाहूनगरीच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न त्यांचे चिरंजीव आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. १९७१ पासून प्रलंबित असलेल्या सातारच्या हाद्दवाढीचा प्रश्न आजअखेर शिवेंद्रसिंहराजेंनी सोडवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत तसंच बहुजन युवकांचं पालकत्व स्वीकारा !

News Desk

“शर्जिलसाठी पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध?”, ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक 

News Desk

अमित शाहांचा शिवसेनेला छुपा संदेश? भाजप-सेना एकत्र येण्याचे पुन्हा संकेत?

Gauri Tilekar