HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसून आहेत, कामच केलं नाही मग सर्टिफिकेट कसं देणार? नारायण राणेंचा प्रहार

मुंबई | आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याचा भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं नाही. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

पालघर हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी नारायण राणेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. राज्यातील विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही. घरातच बसून असतात. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसले नाहीत. बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीकाही त्यांनी केली. कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्नाळामध्ये सापडला टाईम बॉम्ब

swarit

नांदेड पोलिसांकडून अट्टल वाहनचोरास अटक, पाच वाहन जप्त

News Desk

दोन्ही विषय पोलिसांच्या अखत्यारीत त्यामुळे त्यावर ‘नो कमेंट’,निरपेक्ष चौकशी व्हावी – जयंत पाटील

News Desk