HW News Marathi
देश / विदेश

नारायण राणे फडणवीस आणि दरेकरांसह दिल्लीहून कोकणासाठी रवाना!

रत्नागिरी। कोकणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांना आपले प्राण गमावले आहेत . दर्दी कोसळून कित्येकांची घरं उध्वस्त आहेत. कोकणातले नेते जे आता केंद्रीय मंत्री आहेत ते नारायण राणे आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी आपली ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाचं आदिवेशन सुरु आहे.

ट्विटर वरून माहिती

नारायण राणे हे दिल्लीहून कोकणात रवाना झाल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट द्वारे सांगितलं आहे. ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

चिपळूण आणि महाड मधल्या पुराचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पाणी ओसरलं आहे. पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पूरग्रस्तांना मदत

पुरात अडकलेल्या लोकांना अण्णा, पाणी काहीच उपलब्ध नसल्याने अनेक संस्था आता पुढे येऊन मदत करत आहेत. माणगाव येथे सुमारे २००० फुड पॉकेट्स तयार आहेत. अजून २००० अन्नाची पाकिटे तयार होतील. याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शैक्षणिक संस्थांनामध्ये हिजाब बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

विमान दुर्घटनेत पर्यटन मंत्री रबींद्र अधिकारीसह ५ जणांचा मृत्यू

News Desk

वाजपेयींच्या स्मृती जागवणारे १०० रुपयांचे नाणे

News Desk