HW News Marathi
महाराष्ट्र

निवडून आले भाजपच्या जीवावर, सत्तेत गेले विरोधकांबरोबर, राणेंची सेनेवर सडकून टीका

मुंबई | भाजप नेते नारायण राणे आज (१६ जुलै) भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सामनातून झालेली शरद पवार यांची मुलाखत, मुलाखतीत शरद पवार यांनी फडणवीसांवर ओढले ताशेरे, गणेशोत्सव अशा अनेक विषयावर भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेचा दर्प चालत नाही असे म्हटले होते, यावर राणेंनी टीका केली आहे. सत्तेचा दर्प चालत नाही, हे शरद पवार कोणाला बोलत आहेत. मी पुन्हा येईन यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे. पिंजऱ्यात राहून राज्य चालत नाही. शरद पवारांबद्दल मला आदर आहे, मी आदर ठेवूनच बोलतो आहे”, असे नारायण राणे म्हणाले.

“एकीकडे कोरोनाचा कहर आहे आणि सामनामध्ये ही मुलाखत नेमकी कशासाठी, टीका करायला? मुलाखतीत राज्याच्या प्रश्नाबाबत तर काही झालं नाही, तीन दिवसांच्या मुलाखतीत काय साध्य केलं ?”, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, “सामना वृत्तपत्रात शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत म्हणजेच राजकारण आहे. आतापर्यंत सामना वृत्तपत्रात शरद पवारांएवढी टीका कुणावरच झाली नव्हती”, असा टोमणा देखील त्यांनी लगावला आहे.

“सध्या राज्यात कोरोनाचे संकट आहे, राज्याच्या गंभीर परिस्थितीतून जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच ही मुलाखत आहे. नोकरीला सामना आणि काम पवारांचे ही संजय राऊतांची ख्याती आहे”, अशी टीकाही यावेळी राणेंनी संजय राऊत यांच्यावर केली.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रालयात कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलावली होती. यात राणे कुटुंबातील एकाही सदस्याला बोलावले नव्हते. मात्र यावर नारायण राणे म्हणाले की, “गणेशउत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना अडवू नका”.

राणेंनी या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.“सत्तेत जाण्यासाठी शिवसेनेने ही बेईमानी केली आहे. निवडून आले भाजपच्या जीवावर, सत्तेत गेले विरोधकांबरोबर. २०१४ साली शिवसेनेचे आमदार, खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच निवडून आले आहेत,” असेही राणे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं!

News Desk

…म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीत इन्कमिंगला सुरूवात – नवाब मलिक

News Desk

Live Update : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न, २८२ आमदारांनी घेतली शपथ

News Desk