HW News Marathi
देश / विदेश

नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर संतापले!

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक अडथळे येत आहेत. भाजप आणि काँग्रेसमधले वादविवाद नेहमीच समोर येत असतात. असाच एक वाद आता समोर आला आहे. अधिवेशनातील कामकाजात अडथळा आणत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या संसदीय बैठकीत काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला. काँग्रेस पक्षाला ना चर्चेत रस आहे, ना संसदेचं कामकाज चालू देत आहेत अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस सभागृहाचं कामकाज चालू देत नाही

पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष आधी पासूनच आक्रमकतेचा भूमिकेत दिसून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर भाजपा नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेस सभागृहाचं कामकाज चालू देत नाही, तसंच लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही हजर राहत नाही,” असं मोदी यावेळी म्हणाले आहेत.

मोदींकडून काँग्रीसवर टीका

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. भाजपाच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी पक्षातील खासदारांना निर्देश देताना काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं तरी आमचीच चिंता असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. नकारात्मक वातावरण निर्माण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी यावेळी केला आहे.

काँग्रेसवर टीक करताना ते म्हणाले की, “आपण इथपर्यंत आलो आहोत आणि या कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत. काँग्रेसचे वागणं दुर्दैवी आहे. आपण इतक्या दूरपर्यंत आलेलो आहोत आणि लसींचा तुटवडादेखील नाही हे त्यांना पचलेलं नाही. दिल्लीतही २० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे”.

जंतर मंतर मैदानात आंदोलन

काँग्रेस पक्षाकडून जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यात आलं आहे. सभेत मांडलेल्या मुद्यांवरून उत्तर देत नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सगळेच सरकारकडे करत आहेत. शेतकरी बांधव या साठी आंदोलनं देखील करत आहेत. शेतकऱ्यांकडून ‘किसान संसद’ भरवली गेलीय. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी २०० शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Palghar lynching case : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चौकशीसंदर्भात बजावली नोटीस

News Desk

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत CBI कोठडी

Aprna