HW News Marathi
देश / विदेश

बायडन आणि हॅरिस यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | व्हाइट हाउसच्या प्रांगणात काल (२० जानेवारी) अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला असंख्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.

यासंदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचं अभिनंदनही केलं. तसंच, बायडन यांच्यासमवेत काम करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील भागिदारीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी संकल्पित आहे. भारत व अमेरिकेची भागिदारी आपल्यासाठी लाभदायक आहे.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.दरम्यान, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही मोदींनी अभिनंदन केलं आहे. त्यामुळे भारतीय राजकारण आता काय वळण घेणार हे पाहणेही औत्सुक्याचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान यावर्षीही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार

News Desk

बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, जया बच्चन यांचा कंगनाला टोला  

News Desk

भारतात दोन ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडले

swarit