HW News Marathi
देश / विदेश

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली

नवी दिल्ली | बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान आज(२७ जानेवारी) दुपारी त्यांच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे.काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतले होते. मात्र आज पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सौरव गांगुली यांना २ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर ७ जानेवारीला गांगुलीला डिस्चार्ज देण्यात आला होता.

“गांगुलीला हृदयाच्या त्रासामुळे वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर त्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झालं. डॉ. सरोज मोंडल यांच्यासह तीन डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे”, अशी माहिती ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार ?

swarit

आजपासून भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेला सुरुवात

News Desk

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

News Desk