HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लव्हलिनाचं कौतुक, म्हणाले….

नवी दिल्ली | टोक्यो ऑलीम्पिकमध्ये बॉक्सर लव्हलिनाला कांस्यपद मिळालं आहे. तिच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. लव्हलिनाचे यश अनेक भारतीयांना प्रेरणा देईल, असे मोदी म्हणाले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

लव्हलिनाचं सगळेच कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील तिचं खास कौतुक करण्यात आलं आहे. ते म्हणाले, “लव्हलिना बोर्गोहेन खूप चांगली लढलीस. बॉक्सिंग रिंगमधील तुमचं यश अनेक भारतीयांना प्रेरणा देते. तुमचा दृढनिश्चय आणि संकल्प प्रशंसनीय आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.” असं त्यांनी ट्विट केलं आहे.

भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन पदके

भारत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लोव्हलिनाने चांगली लढत दिली. लोव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.

कमलप्रीत कौरला कांस्यपदक

टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनमध्ये पदक मिळवलं असून आज अॅथेलिटक्स खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा होती. डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम स्पर्धेत ती खास कामगिरी करु शकली नाही. ज्यामुळे तिला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. सहा प्रयत्नांत ६३.७० मीटर हा तिचा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक झळ राजभवनापर्यंत, राज्यपालांच्या खर्च कपातीच्या सूचना

News Desk

‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’, जितेंद्र आव्हाडांचा योगींना टोला

News Desk

#NirbhayaCase: दोषी विनय शर्माची याचिका न्यायालयाने फेटाळली

swarit