नवी दिल्ली | काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज (१६ मे) निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून राजीव सातव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
राजीव सातव, संसदेतील चांगला मित्र गमावल्याचे तीव्र दुःख आहे. राजीव सातव आगामी काळातील सक्षम उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो. ओम शांती, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Anguished by the passing away of my friend from Parliament, Shri Rajeev Satav Ji. He was an upcoming leader with much potential. Condolences to his family, friends and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2021
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.
तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!
ॐ शान्ति— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 16, 2021
दरम्यान, राजीव सातव यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजीव सातव यांचे पार्थिव पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.