HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

पंतप्रधानांनी मराठीत केलं ट्विट, मोदींनी दिले महाराष्ट्र सरकारला सहकार्याचं आश्वासन

मुंबई | परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागांना झोडून काढलं आहे. या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं, असं मोदींनी ट्विट करून म्हटले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्य़ाला बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसाने मोठा तडाखा दिला. या दोन जिल्ह्य़ांच्या बहुतांश भागात शंभर मिलिमीटरच्या सरासरीने अतिवृष्टी झाली. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांतही नुकसान केले आहे. या पावसाने या भागातील नद्यांना पूर आले, शेत-शिवारात पाणी शिरले. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.सोलापूर जिल्ह्यात ५६५ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. दरम्यान याच सगळ्या परिस्थितीबाबत आणि त्यावर महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.

 

Related posts

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला

News Desk

बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांना गृह अलगीकरणात ठेवल्याच्या बातम्यांबाबत वस्तुस्थिती

News Desk

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

News Desk