HW News Marathi
देश / विदेश

मराठीत ट्विट करत पंतप्रधान मोदींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

मुंबई। कोरोनाच सावट सर्वच सणांवर गेल्या वर्षांपासून आहे आणि यामुळेच निर्बंध लादण्यात आले असून सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाल्याने भक्तांना विठूमाऊलीच्या दर्शनाला जाता आले नाही. मात्र भक्त आपापल्या परीने विठुरायाची भक्ती करून घरूनच दर्शन घेत आहेत. पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक दरी जी निर्माण झाली मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

केशव उपाध्येंचीही टीका

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ अशा ओळीद्वारे उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…लढाऊ विमान मिराज-२०००ची काही खास वैशिष्ट्ये

News Desk

इस्रोच्या कार्यालयाला आग

News Desk

मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे

Gauri Tilekar