HW News Marathi
Covid-19

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे ११ रुग्णांचा झाला मृत्यू, आणखी रुग्णांचा जीव टांगणीला

नाशिक | राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होत असून कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु आहे. रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं असून गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

झाकीर हुसेन रुग्णालयात १५० जण ऑक्सिजनवर होते. तर २३ रूग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यापैकी ११ रूग्ण दगावल्याची माहिती मनपा आयुक्त आणि राजेश टोपे यांनी दिली आहे. व्हेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचे प्रेशर कमी चालत नसल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. मात्र यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

महापालिकेच्या नोडल अधिकाऱ्याने एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “दुरुस्तीचं काम सध्या सुरु आहे. ऑक्सिजनची मागणी कमी असावी यासाठी काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवलं जात आहे. टाकी अर्धी झाल्यानंतर टँकरमधून पुन्हा ती भरली जाते. यावेळी हा प्रकार घडला”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाधितांचा आकडा ५२१८ तर पुण्यात आत्तापर्यंत ८७ कोरोमामुक्त

News Desk

कोणाला मंत्रालयात जाण्याचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही ! 

News Desk

कोरोनाच्या स्ट्रेनचं जागतिक आरोग्य संघटनेने केलं नामकरण, भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’

News Desk