HW News Marathi
Covid-19

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू

मुंबई । राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असताना नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ह्यात मृत्यूंची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून रुग्णांना वाचवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने ही घटना घडल्याची बाब समोर येत असून या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

“नाशिकमधील या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार !

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ याविषयी बोलताना म्हणाले की, “घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढाई लढत असतांना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार.समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ,आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांच्या जवळ

News Desk

अखेर सापडले ! ‘डेक्सामेथासोन’ औषध ‘कोरोना’वर ठरतेय सर्वात प्रभावी

News Desk

देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू

News Desk