HW News Marathi
Covid-19

बीड जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा ! धनंजय मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

बीड । बीड जिल्ह्यासह राज्यभरात वाढलेल्या कोरोना रुग्णासंख्येमुळे सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, यावर उपाय म्हणून रुग्णालयातच हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा करावा, यासाठी बीड, परळी, आष्टी, गेवराई, माजलगाव, केज या ठिकाणच्या रुग्णालय परिसरात जागांची पाहणी व इतर चाचपणी करून तातडीने प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. २ दिवसांपूर्वी (१९ एप्रिल) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देत असल्याचा निर्वाळा केला होता.
जिल्ह्यातील बीड , आष्टी, माजलगाव, गेवराई आणि केज येथील रुग्णालयातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा करण्यासाठी आष्टीचे आमदार बाळासाहेब काका आजबे, बीडचे आमदर संदीप क्षीरसागर,माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळंके, अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे आदींनी धनंजय मुंडेंकडे मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात परळी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील ऑक्सिजन प्लांट धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून शिफ्ट करण्याचे काम सुरू आहे.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी, प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात यावेत, यासाठी आवशयक खरेदी व अन्य प्रक्रिया तातडीने राबवावी, असे निर्देश देत, याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार वरील ६ तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबतची चाचपणी करून त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास BMC ची परवानगी आवश्यक!

Aprna

“तुझ्या बापाला” हे ट्विट मी नव्हे तर एका संतप्त शिवसैनिकाने केले ! महापौरांचे स्पष्टीकरण

News Desk

१५ मार्चपर्यंत भारतात कोरोना नाही असा मोदी सरकारचा दावा होता – जितेंद्र आव्हाड

News Desk