HW News Marathi
राजकारण

मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश नाशिक नगरसेवकांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे नाशिकमधील भाजप नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. १ सप्टेंबर रोजी शनिवारी मुंढेंविरोधातील अविश्वास ठरावाबाबत बैठक होणार होती. परंतु त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध करवाढीचा मुद्दा पुढे करत भाजपमधील काही नगरसेकांनी अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता. नाशिकरांचे मात्र मुंढेंना खंबीर समर्थन मिळाले. मुंढेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर #wesupportmundhe #nashiksupportsmundhe असे हॅशटॅग्स सुरु होते.

तुकाराम मुंढेंनी परस्पर मिळकत करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे आरोपही त्यांच्यावर केले गेले. नगरसेवकांचे निधी रद्द करणे, त्रिसूत्रीच्या निकषावर नगरसेवकांची कामे नाकारणे अशा अनेक प्रकारांमुळे नाशिक नगरसेवकांचे मुंढेंविरोधी मत तयार झाले. अनेकदा प्रयत्न करूनही आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत अशी नगरसेवकांची भावना निर्माण झाली.

नाशिक नगरसेवकांकडून झालेल्या अविश्वास ठरावाच्या प्रयत्नानंतर मुंढेंनी काही निर्णय सावधगिरीने घेतल्याचे दिसते. मुंढेंनी मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णपणे रद्द करतानाच नवीन वार्षिक भाडेमूल्य आकारणीत केलेली सुमारे तिप्पट वाढ पन्नास टक्क्यांनी मागे घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हाडचे प्रकाश आंबेडकर यांना उत्त्तर

News Desk

“…मिंधे सरकारमध्ये एवढी धमक उरली आहे काय?”, सामनातून हल्लाबोल

Aprna

“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला

Aprna