HW News Marathi
महाराष्ट्र

मला माझ्या देशाची सेवा करणे भाग होते…

पुणे | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशातून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या चाचणीचे किट आत्तापर्यंत भारत बाहेरुन आणत होते. परंतू, पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे किट विकसित केले. या किटचे संशोधन करण्यात एका महिलेचा फार महत्त्वाचा भाग आहे. महिला विषाणूतज्ज्ञ मिनल-दाखवे-भोसले यांनी दिवसरात्र मेगनत करुन कोरोना टेस्ट किट तयार केले आहे. ज्यावेळी त्या या किट बनवण्यासाठी झटत होत्या विशेष म्हणजे त्या गर्भवती होत्या. मायलॅब डिस्कव्हरी या फार्मा कंपनीने भारतातील हा पहिला टेस्ट किट तयार केला आणि त्यानंतर काही तासांनीच मिनल यांनी बाळाला जन्म दिला.

या किटच्या विशेष बाबी सांगताना मिनल म्हणाल्या, “आमच्या किटच्या सहाय्याने फक्त अडीच तासात निदान होणार आहे. तर, परदेशातून मागवण्यात आलेले किट ६ ते ७ तास निदान करण्यासाथी घेतात. तसेच, हा किट बनवण्यासाठी आम्हाला ३-४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता मात्र आम्ही फक्त ६ आठवड्यांत हा किट तयार केल्याचे मिनल यांनी सांगितले.

आमच्यावर कित्येक लोकांच्या जीवनाचा प्रश्न होता त्यामूळे मी आधी देशाची सेवा करणे हेच मला योग्य वाटले, अशी भावना मिनल यांनी व्यक्त केली. एकीकडे किट बनवण्याची अंतिम वेळ आली होती तर दुसरीकडे बाळाला जन्म देण्याचीही. पण किट पूर्णपणे तयार करुन मगंच मीनल यांनी गोंडस अशा मुलीला जन्म दिला. दरम्यान, हा किट बनवण्याच्या मागे १० जणांची टिम होती. प्रसुतीच्या एक दिवस आधी म्हणजे १८ मार्चला मिनल भोसले यांनी तयार केलेले किट मान्यतेसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) सोपवले होते. आणि अखेर NIV कडून ही मान्यता मिळाली आणि महिला विषाणूतज्ज्ञ मिनल-दाखवे-भोसले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी स्वतच्या बाळाला जन्म देण्याआधी कोरोना टेस्ट किटला जन्म दिला. ज्या किटमूळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते

हे किट कसे काम करते अशी विचारणा मायलॅबचे डॉ वानखेडे यांना विचारले असता, जर १० नमुने तपासासाठी आले तर त्यांची चाचणी एकच येणे अपेक्षित आहे आणि त्यात आम्हाला यश मिळाले. मायलॅबने तयार केलेल्या या किटची किंमत १२०० रुपये असून एकावेळी हे किट १०० नमुन्यांची चाचणी करु शकते, असे त्यांनी सांगितले. मिनल यांनी बाळाला जन्म दिला आणि दुसरीकडे या टेस्ट किटला जन्म देत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या टेस्ट किटलाही जन्म दिला. एक महिला सगळ्याच क्षेत्रात सक्षम असते हे मिनल यांच्या या धाडसी कृत्याने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडीला अपघात!

News Desk

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

Aprna

जाणून घ्या…ST कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात कशी झाली वाढ?

News Desk